Coal
Coal Tendernama
विदर्भ

Nagpur : वेकोलित सुरु आहे ओव्हरलोड  कोळसा वाहतूक

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कन्हान-वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोळसा खाणींमध्ये सध्या ट्रक मालकांकडून ट्रकच्या कागदपत्रांचे नूतनीकरण न करता कोळशाची ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. या तक्रारीनंतर ट्रकमालकांत खळबळ पसरली आहे.

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या कोळसा खाणींमध्ये वेकोली कामठी उपप्रदेश, गोंदेगाव उपप्रदेश आणि भानेगाव-सिंगोरी उपप्रदेशाचा समावेश आहे. या तीन उपप्रदेशातून शेकडो खाजगी ट्रक चालक/मालक कोळशाची वाहतूक करतात. कोळशा वहतुकीचे टेंडर रुद्र ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आले आहे. कोळशाची वाहतूक करण्यासाठी संबंधित डब्लूसीएल सब-झोनमधील ट्रक्सना आवश्यक कागदपत्रे देऊनही कोळसा वाहतूक करणे, या प्रक्रियेत ट्रक मालक बराच काळ कागदपत्रांचे नूतनीकरण न करता कोळशाची वाहतूक करत आहेत असे आढळून आले आहे.

युथ लोकल ट्रक ऑनर असोसिएशनचे अध्यक्ष आनंद नायडू यांनी वेकोलीचे मुख्य महाव्यवस्थापक, जरीपटका, नागपूर, वेकोली उप-प्रादेशिक व्यवस्थापक कामठी उप-प्रदेश, वेकोली कामठी उप-प्रादेशिक व्यवस्थापक शरद कुमार दीक्षित यांना तक्रार केली. तक्रार मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी चे आदेश दिले. या प्रक्रियेत वाहतूक पर्यवेक्षक राजू करंडे यांच्याकडे ट्रकचे कागदपत्र तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टोकाला गोंदेगाव व कामठी उपप्रदेशातून ट्रक भरून ओव्हरलोड कोळसा त्याच्या सुरक्षित ठिकाणी नेला जात असून, याप्रकरणी वेकोली व्यवस्थापनासह वेकोली सुरक्षा विभाग आणि आरटीओ तर्फे हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे.

सुरु आहे ओव्हरलोड कोळसा वाहतूक 

प्रत्येक ट्रकची क्षमता 46 टन निर्धारित केलेली आहे. परंतू रुद्र ट्रान्सपोर्टचे संपूर्ण ट्रक 55-56 टन पेक्षा जास्त कोळश्याची वाहतूक करतात आणि कागदपत्रांचे नूतनीकरण न करता वाहतूक सुरु आहे.