Rohit Pawar
Rohit Pawar Tendernama
विदर्भ

Rohit Pawar : मोठे प्रकल्प विदर्भातून का गेले? युवकांचा रोजगार का हिरावला?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : विदर्भातील मोठमोठे प्रकल्प भाजपच्या घाणेरड्या राजकरणाने हातून गेले आणि हजारो युवकांचा रोजगार हिरावला, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बुधवारी नागपुरात बोलताना केला.

रोहित पवार म्हणाले की, टाटा एयरबसचा 20 हजार कोटींचा प्रकल्प नागपुरातून गेला ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जर हे प्रकल्प नागपुरात असते तर हजारों तरुणांना रोजगार मिळाले असते. कारण एक विमान बनविण्यासाठी साडे चार हजार लोक लागतात, असे झाले असते तर विदर्भातील युवकांना चांगला रोजगार मिळाले असते. एमआईडीसीमध्ये जे उद्योग येणार होते तेही नाही आले. भाजप सरकार फक्त दिखावा करीत आहे.

फडणवीसांनी विदर्भासाठी काय केले? 

देवेंद्र फडणवीस पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. दीड वर्षांपासून उपमुख्यमंत्री आहे. या सात वर्षांत विदर्भात एकही मोठा उद्योग आला नाही. मिहानमध्ये जे उद्योग येणार होते तेही गुजरातने पळवून नेले आहेत. कापूस, धान, सोयाबीन उत्पादकांनाही सरकारने काही दिलासा दिला नाही. त्यामुळे विदर्भाचे असतानाही फडणवीस यांनी विदर्भाचे काही भले केले नसल्याचा आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला.