railway
railway Tendernama
विदर्भ

वर्धा-नांदेड नवीन लाईनचा 'या' पाच जिल्ह्यांना मिळेल फायदा; पहिले स्टेशन झाले सुरु

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : वर्धा-नांदेड या नवीन मार्गावरील पहिले देवळी स्टेशन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह 32 रुटसह कार्यान्वित झाले आहे. या मार्गावर वर्ध्यापासून 15 किमी अंतरावर देवळी हे पहिले स्टेशन बनविले आहे.

देवळी स्टेशनमध्ये विशेष म्हणजे रेल्वे मार्गांची संख्या- 3 (1 मुख्य रेल्वे मार्ग, 2 सामान्य लूप लाइन), सिग्नल्सची संख्या- 12 मुख्य + 3 शंट सिग्नल, लोको इंजिन स्थिर करण्यासाठी 1 साइडिंग देखील कार्यान्वित केले. वीज पुरवठा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB)+ 2 DG संच, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) सिस्टीमला प्रकाश पडण्यापासून संरक्षित करण्यासाठी क्लास ए अर्थिंग संरक्षण प्रदान केले आहे. एकूण मार्गांची (रुट) संख्या 32 आहे. वर्धा स्टेशनवरून कनेक्टिव्हिटी- ऑप्टिकल फायबर + कॉपर केबल, विभागातील कोणतीही घटना घडल्यास विभाग नियंत्रणाशी बोलण्यासाठी 15 किलोमीटरच्या संपूर्ण विभागात 1 किमी अंतराने EC सॉकेट प्रदान केले जातात.

वर्धा-नांदेड नवीन मार्ग :

वर्धा-नांदेड नवीन मार्ग  हे 284.65 किलोमीटर चे आहे. यात एकूण 27 स्टेशन बनविले जाणार आहे. याची  किंमत 3435.48 कोटी असून 2139 हेक्टर जमिनीवर लाईन चे काम केले जाणार आहे. यापैकी 1912 हेक्टर (90%) भूसंपादन पूर्ण झाले असून 227 हेक्टर ( 10%) भूसंपादन शिल्लक आहे.

पूर्ण होत आलेले सेक्शन-  

या आर्थिक वर्षात 38.61 किमी वर्धा-देवळी- भिडी- कळंब स्टेशन कार्यान्वित होतील तसेच देवळी स्टेशन सुरु करण्यात आले आहे.

हे काम आहे सुरु-

या नवीन रेल्वे लाईन वर 60 % रेल्वे तर 40 % राज्य सरकार खर्च कारित आहे. 103.16 लाख घनमीटर मातीकाम पूर्ण झाले आहे. या अंतर्गत 35 मोठे पूल पूर्ण झाले असून 79 छोटे पूल आणि रोड अंडर ब्रिज (RUB) हे सुद्धा पूर्ण झाले आहे. विद्युतीकरणाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या नवीन मार्गाच्या पूर्ततेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रामुख्याने वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड या 5 जिल्ह्यांमधील रेल्वे संपर्क सुधारेल आणि या प्रदेशांच्या सामाजिक-आर्थिक विकासात लक्षणीय योगदान मिळेल.