Jobs
Jobs Tendernama
विदर्भ

ओबीसी खात्याच्या नोकर भरतीचे कंत्राट फिक्स?; टेंडर न काढताच काम

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राज्य सरकारद्वारे ७५ हजार नोकऱ्यांची घोषणा करण्यात आली असताना इतर मागास बहुजन खात्याने (ओबीसी) २४७ पदे कुठलीही टेंडर न बोलावता त्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले आहे. निव्वळ पत्रव्यवहाराच्या माध्यमातून एजंसीला काम देण्यात आले असल्याने कंत्राट फिक्स असल्याचे बोलले जात आहे.

ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या एजंसीमार्फत ओबीसी खात्यामधील पदे भरण्यात येणार असल्याचे समजते. या कंपनीने ६ सप्टेंबर २०२२ रोजी ओबीसी खात्याला पत्र दिले आहे. त्यात पदनिहाय दर कळवले आहे. त्यावर ओबीसी खात्याने ७ सप्टेंबर २०२२रोजी पत्र देऊन या एजंसीमार्फत पदे भरण्यास मान्यता दिली आहे. या खात्यांतर्गत प्राथमिक आणि  माध्यमिक आश्रम शाळा, इतर मागास विमुक्त व भटक्या जमाती अंतर्गत बालके, महिलांचे सामाजिक कल्याण, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय इत्यादीकरिता घरकूल निर्माण, तांडा वस्ती विद्याद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी योजना राबवण्यात येणार आहेत. त्याकरिता मनुष्यबळाची गरज भसणार आहे. 

२४७ पदांमध्ये विधि अधिकारी २, वरिष्ठ तंत्रज्ञ१,  सिस्टिम ॲनॉलिस्ट, टेंडा एंट्री १, ऑपरेटर १,  संगणक सहायक ५, संगणक ऑपरेटर १२२, चालक ४३, पहारेकरी ३६, सफाई कर्मचारी ३६ असे पदे भरण्यात येणार आहेत. उपरोक्त पदे कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणार असल्याचे समजते. असे असले तरी कुठल्याही टेंडर वा जाहिरात न देता एका कंपनीला परस्पर काम देण्यात आले असल्याने हे कंत्राट फिक्सिंग असल्याची चर्चा आहे.