Nagpur Z P
Nagpur Z P Tendernama
विदर्भ

नागपूर झेडपीत पेन्शन घोटाळा; कर्मचाऱ्यांचे टेबल बदलणार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषदेच्या पारशिवनी पंचायत समितीमध्ये पेंशन घोटाळा समोर आल्यानंतर प्रशासन खळबडून जागे झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांनी सर्व विभागांना आर्थिकबाबीसोबत खाते तपासण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच प्रमाणे तीन पेक्षा अधिक काळ एक टेबल सांभाळण्याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.

कर्मचाऱ्यांचा ३ वर्षाने कामाचा टेबल आणि प्रत्येक पाच वर्षांनी विभाग बदलणे आवश्यक आहे. पारशिवनी पेंशन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या महिला कनिष्ठ लिपीक सरिता नेवारे ९ वर्षापासून एकाच विभागात व एकट टेबल सांभाळत होती. या प्रकरणी महिला कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला. एकाच टेबलवर कार्यरत असल्यामुळेच नेवारेंनी हा गैरव्यवहार करण्याची हिंम्मत केल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील इतरही पंचायत समिती स्तरावर मनुष्यबळाचा अभाव आहे. अशात अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच टेबलचे काम हाताळत आहेत. पारशिवनी पं.स.सारखा प्रकार जिल्ह्यातील इतरही पंचायत समित्यांमध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व विभागांना खात्यांची माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले. त्याच प्रमाणे तीन वर्षापासून एकच टेबल सांभाळत असणाऱ्यांची माहिती सुद्धा सादर करण्याचे निर्देश सीईओंनी दिल्याचे समजते.