Pardi Bridge
Pardi Bridge Tendernama
विदर्भ

Nagpur : पूर्व नागपूरची शान ठरणाऱ्या 'या' उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या हस्ते पारडी उडाणपुलाच्या (Pardi Flyover) तीन टप्प्यांचे उद्घाटन करण्यात आले. बावनकुळे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रयत्नातून उपलब्ध 649 कोटी रुपयांच्या निधीतून तयार झालेला हा उड्डाणपूल पूर्व नागपूरचा मैलाचा दगड आणि पारडीचा हिरा आहे. पारडी उड्डाण पूल ऐतिहासिक असल्याचे सांगून ते म्हणाले की, यामुळे नागपुरातील वाहतूक समस्या सुटणार आहे.

राज्यातील प्रसिद्ध उड्डाण पूल

आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की, पारडी उड्डाण पूल हा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरला आहे. एक काळ असा होता की पार्डी-भंडारा रोड हा अपघातांसाठी कुप्रसिद्ध होता. मात्र आता हा पूल राज्यात ओळखला जाणार आहे. 4.50 किमी लांब उड्डाण पुलाने कळमना, पारडी, वाठोडा, वर्धमाननगर जोडलेले आहेत. यापैकी 3.50 किलोमीटरचे तीन टप्पे सुरू झाले आहेत. येत्या 4 महिन्यांत वाठोडा आणि रिंगरोड टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उडाण पुलाचे उद्घाटन होणार आहे. काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी या पुलाची पाहणी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 2014 मध्ये पारडी उड्डाणपुलाच्या (Pardi Flyover) बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. जून 2016 मध्ये, गेनॉन डंकर्ले एंड कंपनी लिमिटेड आणि मेसर्स एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम सुरू करण्यात आले या प्रकल्पाची एकूण किंमत 649 कोटी रुपये असून, त्यापैकी 448.28 कोटी रुपये नागरी बांधकामावर खर्च करण्यात आले.