Kolhapur Bandhara
Kolhapur Bandhara Tendernama
विदर्भ

Nagpur: काटोल, नरखेड तालुक्यांसाठी गुड न्यूज...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महाविकास आघाडीचे सरकारने काटोल व नरखेड तालुक्यातील सिंचन क्षमता वाढावी यासाठी 102 कोटीच्या कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे मंजूर करण्यात आले होते. यातील 23 कोल्हापुरी बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून 35 कामे प्रगतिपथावर आहेत. इतर कामेसुद्धा लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख यांनी दिली.

काटोल व नरखेड तालुक्यात पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री, या भागाचे आमदार अनिल देशमुख यांच्या प्रयत्नातून या बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती. ही सर्व बंधारे पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात भुजल पातळी तर वाढेलच शिवाय नदी लगतच्या शेतकऱ्यांना बारमाही पिके घेण्यासाठी सुद्धा सोईचे होणार असल्याची माहिती सलिल देशमुख यांनी दिली.

या गावातील कामे पूर्ण

कलंभा, शेमडा, सावरगाव, तपणी, तिनखेडा, पिपळा खु., खरसोली, पिंपळगाव, खेडी गोवारगोंदी येथे प्रत्येकी एक तर धोत्रा व पांजरा रिठी येथे दोन, आग्रा, खापा जनाबाई तसेच डोरली भांडवलकर येथे प्रत्येकी तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.

या गावातील कामे प्रगतिपथावर

फेटरी, वांदली, चंदनपार्डी, बोरखेडी, दिग्रस बु., पिपला केवलराम, खेडी करयत, आग्रा, लोहारी सावंगा, आरंभी, येनिकोनी, कोणी, येरळा पावडे, पिंपळघर, खरसोली, मोहदी दळवी, तळेगाव रिठी, नरखेड, वरळीगाव, मानंदरगाव, दि. माणिकवाडा, परसोडी, मोवाड, देवळी, गांगलडोह येथे प्रत्येकी एक तर अंबाडा देशमुख, भायवाडी व मालापूर येथे दोन बंधाऱ्यांचे काम प्रगतिपथावर आहे.

या गावातील कामांवर स्थगिती

चंदनपार्डी, दिग्रस, बिहलगोंडी, अंबाडा सोनक, वंदली खु., सोनोली, खंडाळा बु., रिंगणाबोडी, मोहगाव, ढोले, मसाळा, हरणखोरी, बोरखेडी, पांजरा काटे, राउळगाव, वाई खु, दिग्रस बु., शेकापूर, खंडाळा, डोरली भांडवलकर, मोहदी दळवी, येरला पावडे, खैरगाव, सिंगारखेडा, नरखेड, बेलोना, गुमगाव, येणीकोणी, कोणी या गावातील बंधाऱ्यांना स्थगिती देण्यात आली आहे.

29 कामांवरील स्थगिती उठवावी

काटोल व नरखेड तालुक्यासाठी 102 कोटींचे 86 कोल्हापुरी बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 23 बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाली असून 35 कामे प्रगतिपथावर आहे. यापैकी 29 कामांवर ही राज्य सरकारने स्थगिती आणली आहे. यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या कामावरील स्थगिती राज्य सरकारने तातडीने उठविण्याची गरज आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करीत असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका सुद्धा दाखल केल्याची माहिती सलिल देशमुख यांनी दिली.