amazon flipkart
amazon flipkart Tendernama
विदर्भ

Mumbai : अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट बरोबर राज्य सरकारने का केले करार?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कृषी मूल्य साखळी अंतर्गत शेतकर्‍यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट या कंपन्यांशी राज्य सरकारने करार केले आहेत.

मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध सामंजस्य करार करण्यात आले.

या करारांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषिमूल्य साखळी भागिदारी बैठकीत उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सर्वांत महत्त्वाचे सामंजस्य करार झाले, ज्याची आमच्या शेतकरी बांधवांना गरज आहे, ते कृषी विभागाचे आहेत. यात अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांच्यासमवेत करार झाले. यामुळे शेतकरी आपला कृषिमाल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत. आजच्या संपूर्ण दिवसातील हा कार्यक्रम माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.

राज्य सरकारने कृषी मूल्य साखळीचा दुसरा टप्पा आता प्रारंभ केला आहे. सबसिडीतून, नुकसानभरपाईतून शेतीचे क्षेत्र बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना 2014-19 या काळात करण्यात आल्या. शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, स्मार्ट यासारख्या योजनांची आखणी झाली.

वातावरणपूरक शेती हाही प्रयत्न झाला. शेतकर्‍यांना थेट बाजाराशी जोडण्याचा निर्णय झाला. त्यासाठीच कृषी मूल्य साखळीच्या उपाययोजना प्रारंभ करण्यात आल्या. या पुढच्या टप्प्याचा प्रारंभ केल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे मन:पूर्वक अभिनंद करतो. राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी अतिशय खंबीरपणे उभे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.