Deekshabhoomi
Deekshabhoomi Tendernama
विदर्भ

Nagpur : दीक्षाभूमीला मिळाले 70 कोटी; लवकरच निघणार टेंडर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : दीक्षाभूमी परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने पुन्हा 70 कोटी रुपये दिले आहेत. या कामासाठी 40 कोटी यापूर्वीच नागपूर रिफॉर्म ट्रस्टमध्ये जमा करण्यात आले आहेत. आता 110 कोटींच्या निधीतून विकासकामे केली जाणार आहेत. लवकरच यासाठी टेंडर काढले जातील. या कामांसाठी नागपूर रिफॉर्म ट्रस्टची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने गुरुवारी 70 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दीक्षाभूमीचा जागतिक स्तरावर विकास केला जाईल. त्यासाठी राज्य सरकारने विकासाचे नवे मॉडेल तयार केले आहे. हा विकास आराखडा 214 कोटी रुपयांचा आहे. या आराखड्यानुसार काही वर्षांपूर्वी पहिल्या टप्प्यात 40 कोटींचा निधी नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टला देण्यात आला होता, मात्र तांत्रिक कारणामुळे काम सुरू होऊ शकले नाही. आता यात कोणताही तांत्रिक अडथळा नसल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे लवकरच विकासकामांना सुरुवात होणार आहे.

ही कामे केली जातील

मध्यवर्ती स्मारकाचे प्रवेशद्वार नवीन, मोठे आणि कलात्मक असेल. ओपन थिएटर आणि भव्य मुख्य गेट बनवण्यात येणार आहे. अशोक स्तंभाची उंची 11.12 मीटर असेल. कायमस्वरूपी स्टेज आणि नवीन कलात्मक सुरक्षा भिंत बनविली जाईल.