Mahagenco Koradi
Mahagenco Koradi Tendernama
विदर्भ

Nagpur : वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून स्थानिकांनाच मिळणार प्राधान्य

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कोराडी येथील वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून नेमण्यात येणाऱ्या कामगारांमध्ये स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य देण्यात येईल. तसेच, महिला बचत गटाच्या कामांमध्ये कामगारांना देण्यात येणारी वेतन भिन्नता दूर करण्यात येईल, कंत्राटदारांमार्फत कामगारांवर होणारा अन्याय दूर करू, कंत्राटदाराच्या मनमानीला आवर घालू व ज्या कामगारांनी महानिर्मितीत काम करून पूर्ण आयुष्य वेचले अशा कामगारांच्या पाल्यांना महानिर्मितीत रोजगार देण्यासाठी प्राथमिकतेने विचार करू, असे आश्वासन कोराडी वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी पार पडलेल्या बैठकीत शिष्टमंडळाला दिले.

6 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या वतीने आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी 14 ऑक्टोबरला या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार, पार पडलेल्या बैठकीत आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात ऊर्जा भवन कार्यालय कोराडी येथील वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून नेमण्यात येणाऱ्या कामगारांमध्ये स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य देण्यात येईल. तसेच, महिला बचत गटाच्या कामांमध्ये कामगारांना देण्यात येणारी वेतन भिन्नता दूर करण्यात येईल, कंत्राटदारांमार्फत कामगारांवर होणारा अन्याय दूर करू, कंत्राटदाराच्या मनमानीला आवर घालू व ज्या कामगारांनी महानिर्मितीत काम करून पूर्ण आयुष्य वेचले अशा कामगारांच्या पाल्यांना महानिर्मितीत रोजगार देण्यासाठी प्राथमिकतेने विचार करू, असे आश्वासन कोराडी वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी पार पडलेल्या बैठकीत शिष्टमंडळाला दिले.

त्यानुसार, पार पडलेल्या बैठकीत आ. सुनील केदार यांच्या नेतृत्वात ऊर्जा भवन कार्यालय येथे विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी बेरोजगारांच्या समस्या मांडल्या. याप्रसंगी, रत्नदीप रंगारी, सुरेश भोयर, जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकर्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, सभापती अवंतिका लेकुरवाळे, पं.स. सभापती दिशा चनकापुरे, नगरसेवक तिलक गजभिये, संजय रामटेके, शरद मेश्राम, कैलाश खेरगडे, आकाश उके, शैलेश गजघाटे, राजू पवार उपस्थित होते.