Chandrapur
Chandrapur Tendernama
विदर्भ

Chandrapur : 'या' दोन नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीत होणार विकासकार्य कारण...

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : मूल, बल्लारपूर नगर परिषद आणि पोंभुर्णा नगर पंचायतीसाठी राज्य सरकारने 29 फेब्रुवारी 2024 रोजी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विशेष अनुदानातून 25 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान दिला जातो. बल्लारपूर नगर परिषदेला 12 कोटी 34 लाख 97 हजार रुपये, मूल नगर परिषदेला 6 कोटी 25 लाख 3 हजार रुपये आणि पोंभुर्णा नगर पंचायतीसाठी 6 कोटी 40 लाख रुपये, असे एकूण 25 कोटी रुपये मंजूर झाले आहे. बल्लारपूर नगर परिषद अंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये खुल्या जागांचा विकास करणे, खुल्या जागेवर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, बल्लारपूर वेकोली संकुलात व्हॉलीबॉल ग्राऊंडचे बांधकाम, स्प्रिंकलर व पाणी व्यवस्थापन, सेपरेटर गॅलरीचे बांधकाम करणे, नवीन टॉयलेट ब्लॉक आणि चेंजिंग रूमचे बांधकाम, विद्यमान पॅव्हेलियनचे इमारतीचे नूतनीकरण आणि वेकोली संकुलात क्रीडा, तेलगू समाज स्मशानभूमी व सी.सी. रोड बांधकामांसाठी बल्लारपूर नगर परिषदेला 12 कोटी 34 लाख 97 हजार रुपये मिळणार आहे. 

मूल नगरपरिषदेअंतर्गत मटन मार्केट येथे मैला शुद्धीकरण उभारणी, न.प. अंतर्गत रस्ते बांधकाम, सी.सी. रोड, लादीकरण व नाली बांधकाम, खुल्या जागांचा विकास यासाठी मूल नगर परिषदेला 6 कोटी 25 लाख 4 हजार रुपये मंजूर झाले. पोंभूर्णा नगर पंचायतीला 6 कोटी 40 लाख रुपये मंजूर झाले. यामध्ये अंतर्गत रस्त्या नाल्यांचे बांधकाम होणार आहे. क्रीडा, तेलगू समाज स्मशानभूमी व सी.सी. रोड बांधकामांसाठी बल्लारपूर नगरपरिषदेला 12 कोटी  34 लाख 97 हजार रुपये मिळणार आहे. मूल नगरपरिषदेअंतर्गत मटन मार्केट येथे मैला शुद्धीकरण उभारणी, न.प. अंतर्गत रस्ते बांधकाम, सी.सी. रोड, लादीकरण व नाली बांधकाम, खुल्या जागांचा विकास यासाठी मूल नगरपरिषदेला कोटी २५ लाख ४ हजार रुपये मंजूर झाले. पोंभूर्णा नगर पंचायतीला 6 कोटी 40 लाख रुपये मंजूर झाले. यामध्ये अंतर्गत रस्त्या नाल्यांचे बांधकाम होणार आहे.

ग्रामीण व शहरी भागात नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची गरज आहे. मूल, बल्लारपूर नगरपरिषद आणि पोंभुर्णा नगर पंचायतीसाठी पाठपुरावा केल्याने राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विशेष अनुदानातून 25 कोटींचा निधी मंजूर केला आहे. अशी प्रतिक्रिया वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.