Nagpur ZP
Nagpur ZP Tendernama
विदर्भ

नागपूर जिल्हा परिषदेतील दोन कोटींच्या फाईल कशासाठी रोखल्या?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व काही आलबेल नाही आहे. पदाधिकारीच एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे. महिला व बाल कल्याण समितीशी संबंधित सुमारे दोन कोटींच्या पाच ते सात फाईल अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी रोखून ठेवल्या आहेत. अध्यक्ष सर्वच विभागात हस्तक्षेत होत असल्याने नाराजीचा सूर वाढत चालला आहे.

जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी बसताच सत्ताधाऱ्यांमध्ये शीत युद्ध सुरू झाले होते. जुने व नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. नवीन पदाधिकाऱ्यांकडून जुन्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय फिरवण्यात येत आहे. विद्यमान अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या सर्कलमध्ये देण्यात आलेल्या निधीला कात्री लावली. इतरही काही निर्णय फिरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे त्यांनी विद्यमान सभापतींच्या कार्यकक्षेतही हस्तक्षेप सुरू केल्याचे दिसते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अध्यक्षा कोकड्डेंनी सर्व विभागाशी संबंधिती फायली त्यांच्याकडे बोलविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात याचा फटका महिली व बाल कल्याण समितीला बसला. महिला व बाल कल्याण समितीशी संबंधित पाच ते सात फाईल्य त्यांनी आपल्याकडे बोलावून घेतल्या. पंधरा ते वीस दिवसांपासून या फाइल्स त्यांच्याकडे धुळखात पडून आहे. त्यांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही. फक्त फाइल अडकवून ठेवल्याने विविध चर्चा रंगल्या आहे. यावरून समिती सभापती अवंतिका लेकुरवाळे व अध्यक्षा कोकड्डे यांच्यात बेबनाव असल्याची माहिती आहे. अध्यक्षांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे नाराजी असून भविष्यात पदाधिकाऱ्यांमध्येच खटके उडणार असल्याचे दिसते.