Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक; हजारो कोटींचे रखडलेले प्रकल्प मार्गी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी शहरातील हजारो कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मास्टर स्ट्रोक लागावला आहे. दीक्षाभूमी अ वर्ग पर्यटनाचा दर्जा, संत जगनाडे स्मारक, संत चोखामेळा वसतिगृहांचे काम मार्गी लावून सोशल इंजिनिअरिंग केले तर दुसरीकडे महापालिकेत पदभरती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी प्रकल्पाला सर्वांना खुश केले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आता निवडणुकीला सामोरे जाताना मोठा मुद्दा त्यांनी हाती दिला आहे.

नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या रखडलेल्या विविध प्रकल्प, योजनांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. संत जगनाडे महाराजांच्या स्मारकाच्या निविदेचे काम  अंतिम टप्प्यात आले. त्यामुळे या स्मारकाच्या वाढीव खर्चासाठी तत्काळ प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. यावेळी त्यांनी ड्रॅगन पॅलेस टेंपललासुद्धा आवश्यक निधी देण्यात येईल, असे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरसाठी २२ कोटी, शांतिवनसाठी ७.७६ कोटी रुपये देण्यात येणार असून कामाला गती देण्यात यावी. ११८ कोटी रुपये खर्च करून संत चोखामेळा वसतिगृहाचे काम करण्यात येणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून हे वसतीगृह १३ मजली करुन एक हजार  विद्यार्थी क्षमतेचे करावे, अशी सूचना त्यांनी दिली. या बैठकीत अनेक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले तरी काही प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले. शहरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी साहित्य खरेदी, अग्निशमन केंद्र, मनपा टाऊन हॉल, बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन, देवडिया हॉस्पिटल, नंदग्राम प्रकल्प, नरसाळा-हुडकेश्वर मूलभूत सुविधा कामे तसेच मलवाहिका व्यवस्थापन इत्यादी कामांसाठी १ हजार ५०६ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. त्यासंदर्भातील पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. परमात्मा एक सेवक भवनसाठी ४५ कोटी रुपयांचा आराखडा नियोजन विभागाकडे पाठवा, असेही निर्देश त्यांनी दिले.

प्रकल्प व प्रस्तावित निधी
- महापालिकेचे विविध प्रकल्पांसाठी : १ हजार ५०६ कोटी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर : २२ कोटी
- शांतिवनसाठी : ७.७६ कोटी
- संत चोखामेळा वसतीगृहाचे काम : ११८ कोटी
- मेयोतील कामे : ३०२ कोटी
- मेडिकल : ५९४ कोटी
- लोहघोगरी टनेल प्रकल्प : ३ हजार ६१२ कोटी
- कोराडीतील विकासासाठी आधीच्या टप्प्यातील ६३ कोटी, पुढच्या टप्प्यासाठी २१४ कोटींची