Mid Day Meal
Mid Day Meal Tendernama
विदर्भ

ठेकेदाराचा प्रताप; शासकीय धान्य विकताना पडकला रंगेहात!

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरांमधील (Nagpur City) शाळांमध्ये पोषण आहाराचा (Mid Day Meal) पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार (Contractor) शासकीय धान्याची विक्री खुल्या बाजारात करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून पाच जणांना अटक केली आहे. महापालिकेत पोषण आहाराचे कंत्राट सादर करण्यासाठी अनेक बचत गटांनी खोटे दस्‍तावेज सादर केल्याची शंका असल्याने आता सर्वांचीच चौकशी केली जाणार

तपासा दरम्यान पोलिसांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात विचारणा केली. त्यांनी मुलांच्या भोजनसाठी ५० किलो वजनाचे १०० पोते दिल्याचे सांगितले. मात्र बचत गटाच्या किचनमध्ये फक्त ५० तांदळाचे पोते मिळून आले. मोठी अफरातफर निदर्शनास आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, दोघांना अटक केली. या प्रकरणातील आणखी ९ आरोपी अद्यापही फरार आहेत.

कागदपत्रे नसताना कंत्राट
महानगरपालिकेच्या पोषण आहार विभागाने सेंट्रल किचनसाठी टेंडर मागविण्यात आले. यामध्ये ३९ संस्थांनी टेंडर भरले होते. १२ जुलैला टेंडर काढून त्यापैकी ९ संस्थांची शहरातील शाळांमध्ये पोषण आहार देण्यासाठी निवड करण्यात आली. यापैकी काहींनी आवश्यक दस्तावेज सादर केले नव्हते. टेंडरनुसार अपात्र ठरल्यानंतरही त्यांना कंत्राट देण्यात आले होते.