Shinde, Fadnavis, Pawar
Shinde, Fadnavis, Pawar Tendernama
विदर्भ

Bhandara : शिंदे - फडणवीस - पवार यांनी भंडाऱ्यात काय केली घोषणा? तब्बल 168 कोटींच्या...

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्ह्यातील 168 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन b लोकार्पण केले. यासोबतच शासनाच्या विविध विभागाच्या योजनांमधून लाभ घेणाऱ्या 27 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमस्थळी रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. यात विविध नामांकित कंपन्यांच्या वतीने त्यांच्याकडील रिक्त 1500 जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीद्वारे निवड झालेल्या अमोल तेलमासरे, संदीप वंजारी आणि सुधीर चिंधालोरिया या तीन उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.

सर्वसामान्य नागरिकांना आपले निवेदन, तक्रार, म्हणणे सादर करता यावे, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने स्वतंत्र दालन लावण्यात आले होते. रोजगार मेळाव्यात अनेक युवकांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घेतला. लाभार्थ्यांना प्रदर्शनस्थळी विविध योजनांची माहिती देण्यात आली. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगीतले की, राज्यात सिंचन प्रकल्प निर्माण केले जात आहे. राज्यातील 8 लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असे प्रयत्न सरकार करते आहे. शासन आपल्या दारी हा 18 वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या मध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

भंडारा गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने धानाला बोनस हा नागपूर हिवाळी अधिवेशनात जाहीर करणार असल्याचे मुख्यंत्र्यांनी सांगीतले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्याच प्रदेशातील नागरिकांचा सरकार विचार करते. धान शेती व्यतिरिक्त फळ आणि इतर नगदी पिकाची लागवड करून शेतकऱ्यांचा विकास कसा करावा यासाठी आमच्या शासनाद्वारे प्रयत्न केले जातील. भंडारा जिल्ह्यात पुराचे पाणी घरात गेलेल्या कुटुंबांना आधी 5 हजार रुपये दिले जात होते. आज महायुती सरकारने 10 हजार रुपये दिले आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गावोगावी सरकारच्या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे काम सरकार करते आहे. सगळी धान खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचा बोनस द्यावा अशी त्यांनी विनंती केली. धानाला खोडकिड लागली असेल तर असा शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. सरकारने मुख्यमंत्री सौर वाहिनी सुरू केल्याने शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याचा प्रयत्न आहे.