Nagpur City
Nagpur City Tendernama
विदर्भ

नागपुरकरांसाठी धोक्याची घंटा! प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीरणामुळे नागपूर शहरातील प्रदूषणही सातत्याने वाढत चालले आहे. मे महिन्यातील तब्बल २१ दिवस प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) घेतली आहे. मोठ्‍या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. धुलीकणांमुळे प्रदूषणात मोठ्‍या प्रमाणात भर पडल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे. (Pollution in Nagpur City)

सध्या नागपूर शहर चांगलेच तापले आहे. मागील दोन दिवस पार ४६ अंशावर गेला होता. त्यामुळे कुलर आणि पंखे नावाचेच झाले आहे. त्यामुळे नागपूरकरांची प्रचंड होरपळ सुरू आहे. इमारतीचे बांधकाम थांबले आहे. मेहनतीची कामे सकाळी आणि सायंकाळी पाच नंतर सुरू केली जात आहेत. असे असताना प्रदूषणाची पातळी वाढली आहे. ही नागपूरकरांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. यावर्षी उन्हाळ्यात तीन-चार उष्ण लहरींनी नागपूरकर हाेरपळले आहेत. अशात एकीकडे उन्हाचा तडाखा सुरू असताना प्रदूषणाचा मारही नागपूरकरांवर पडत आहे.

यावर्षी प्रदूषणाची पातळी वाढली आहे. वाढलेली वाहतूक व माेठ्या प्रमाणात सुरू असलेल्या
बांधकामांमुळे धुलीकणांचेही प्रदूषण वाढले आहे. सीपीसीबीने घेतलेल्या नाेंदीचे अवलाेकन केले असता गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रदूषणाच्या स्तरात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात आतापर्यंतर्यंतच्या २९ दिवसांत २१ दिवस प्रदूषणाचा स्तर उच्चांकीवर हाेता. यातील ३ दिवस अतिप्रदूषित होते. केवळ दाेन दिवस स्थिती चांगली हाेती. एप्रिल महिन्यात १७ दिवस प्रदूषित आणि ११ दिवस हवेची गुणवत्ता चांगली हाेती.