Pothole Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या रस्ते दुरुस्तीसाठी आयुक्तांकडून नवी मुदत; नवे आश्वासन...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिकमधील (Nashikcity) रस्त्यांवर पडलेले खड्डे (Potholes) पाऊस थांबल्यानंतर बुजवले जातील. आवश्यक तेथे महापालिका (Nashik Municipal Corporation) खर्च करेल व तीन वर्षांच्या आत बनवलेले रस्ते ठेकेदारांकडून (Contractors) कामे करून घेतली जातील. पाऊस उघडल्यानंतर महिनाभरात रस्ता दुरुस्त न झाल्यास संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत (Blacklist) टाकले जाईल, असा इशारा देतानाच महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरात सध्या वेगाने पाऊस पडत असल्याने पाऊस उघडल्यावर सर्व रस्ते पूर्वीप्रमाणे तयार होतील, असे आश्वासन पत्रकार परिषदेत दिले. यापूर्वी त्यांनी गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याची दिलेली मुदत आणखी महिनाभर पुढे ढकलली आहे.

आयुक्त पुलकुंडवार यांनी पत्रकार परिषदेत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत उत्तरे दिली. ते म्हणाले, सातत्याने पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहे. जीएसबी मटेरिअलने खड्डे बुजवूनदेखील उपयोग नाही. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे बुजवले जातील. उत्सव काळात खड्डे बुजवण्यात आले. मात्र, त्यानंतरही सातत्याने व वेगाने पाऊस पडत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. पाऊस थांबल्यानंतर पूर्वी प्रमाणेच रस्ते जैसे थे होतील, असा दावा त्यांनी केला.

स्मार्ट सिटी व गॅस पाईप लाईन आदी कामांसाठी रस्ते खोदल्याने नागरिकांना त्रास झाल्याचे मान्य करताना ती कामे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावर्षी पावसाळा सुरू होईपर्यंत कामे सुरू राहिल्याने नागरिकांना त्रास झाला. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंतच खड्डे खोदण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यानंतर परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार

पाऊस थांबल्यानंतर महिन्याभरात रस्त्यांची कामे केली जातील. पूर्वीप्रमाणे खड्डे विरहित रस्ते करताना आवश्यक असेल तिथे अधिक आढळून येत आहे. महापालिका स्वतः खर्च करेल, ज्या रस्त्यांचे दायित्व वर्षासाठी ठेकेदारांकडे आहे, त्या रस्त्यांची कामे संबंधितांकडून करून घेतली जातील. महिन्याभरात रस्ता दुरुस्ती न झाल्यास अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.