Vijay Shivtare
Vijay Shivtare Tendernama
पुणे

'विमानतळ पुरंदरमध्येच होणार; भूसंपादनाची अधिसूचना 15 दिवसांत'

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Proposed International Airport At Purandar) भूसंपादनासाठी येत्या पंधरा दिवसांत अधिसूचना निघेल, अशी माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बुधवारी सांगितले.

विमानतळ ज्या गावांत होणार आहे, त्या सात गावांमधील काही नागरिकांनी प्रकल्पाला जमीन देण्यासाठी जी तत्परता दाखवायला पाहिजे होती, ती दाखवली नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या माध्यमातून विमानतळासाठी जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवतारे म्हणाले, विमानतळ प्रकल्प बारामतीला करण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरविले होते. मात्र, नव्या जागेला केंद्राकडून नकार देण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांत यापूर्वी निश्चित केलेल्या जागेतच प्रकल्प होणार आहे. सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून भूसंपादन करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना पुढील १५ दिवसांत निघेल.