Indian Railways
Indian Railways Tendernama
पुणे

Pune: 'या' मार्गावर रेल्वे प्रशासन क्लोन ट्रेन सोडणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्याहून दानापूरला (Pune - Danapur Train) जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुटीत विशेष रेल्वे सुरू केली असली तरीही दानापूर रेल्वेला रोजच सुमारे पाचशे प्रवासी वेटिंगवर आहेत.

हे लक्षात घेता पुणे रेल्वे प्रशासनाने पुणे-दानापूर दरम्यान क्लोन ट्रेन सोडण्याची मागणी जोर धरत आहे. पुण्याहून क्लोन ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल.

पुण्याहून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. सध्या पुणे-दानापूर दरम्यान दैनंदिन एक गाडी धावते तर दर शनिवारी देखील एक उन्हाळी विशेष गाडी धावते. या दोन्ही गाड्यांत प्रवाशांची प्रचंड गर्दी असते.

केवळ सामान्यच नाही तर आरक्षित डब्यांतही प्रवासी अक्षरशः घुसतात. सामान्य डब्यांत तर प्रवाशांना जीव मुठीत घेऊन चढावे लागते. त्यामुळे पुणे-दानापूर एक्स्प्रेस सुटल्यावर अर्धा ते एका तासाच्या अंतराने पुन्हा क्लोन ट्रेन (कमी डब्यांची दुसरी रेल्वे) सोडावी अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

पुणे-दानापूर एक्सप्रेसला प्रवाशांची नेहमीच प्रचंड गर्दी असते. डब्यांत चढताना अनेकदा चेंगराचेंगरीचे प्रकार घडले आहेत. हे लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने क्लोन ट्रेन सुरू करावी.
- आनंद सप्तर्षी, स्थानक सल्लागार समिती सदस्य, पुणे