PMP Bus Pune
PMP Bus Pune Tendernama
पुणे

Pune: आता तरी PMP चालक, वाहक पुणेकरांशी सौजन्याने बोलणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बेशिस्त चालक व वाहक यांना शिस्त लावण्यासाठी पीएमपीने (PMP) एक अनोखी शक्कल लढवली आहे. बेशिस्त चालक व वाहकांविरोधात पुराव्यानिशी एखाद्या प्रवाशाने तक्रार केल्यास त्याला शंभर रुपये बक्षिस दिले जाणार आहे. चालक, वाहकांच्या वर्तनात सुधारणा व्हावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चालक व वाहकांच्या बेशिस्त वर्तनाबाबत पीएमपी प्रशासनला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात मोबाइलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे अशा स्वरूपाच्या तक्रारी असतात. चालक व वाहकांच्या वर्तनात सुधारणा व्हावी, म्हणून योजना सुरू करण्यात आली आहे.

चालक व वाहकांविरोधात पुराव्यानिशी एखाद्या प्रवाशाने तक्रार केल्यास त्याला १०० रूपये बक्षिस दिले जाणार आहे. आलेल्या तक्रारीची व पुराव्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर प्रवाशाला बक्षिस दिले जाईल. तसेच, संबंधित चालक अथवा वाहकाला एक हजार रूपये दंड केला जाणार आहे. दंडाची रक्कम संबंधितांच्या पगारातून वसूल केली जाणार असल्याचे पीएमपीकडून स्पष्ट करण्यात आले.