Traffic
Traffic  Tendernama
पुणे

Pune-Mumbai महामार्गासह 'द्रुतगती' विकएंडला का झाला जॅम?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सलग सुट्यांमुळे रविवारी (ता. ३०) दुसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. (Mumbai-Pune Expressway)

नुकत्याच विद्यार्थ्यांच्या संपलेल्या परीक्षा व सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे अनेकांनी गावी जाण्याचा किंवा फिरायला जाण्याचा बेत केल्याने शहरी भागातील विद्यार्थी, पालक व मित्र परिवार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. यामुळे पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळपासून वाहनांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

शनिवारी (ता. २९) सकाळी सुरू झालेली वाहतूक कोंडी रविवारी (ता. ३०) दुसऱ्या दिवशीही कायम होती. महामार्गावरील सोमाटणे टोलनाका व द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ती दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.