Pune Airport Tendernama
पुणे

Pune : मोदीजी, पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्‌घाटन कधी होणार?

Pune Airport : संपूर्ण तयार असूनही पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्‌घाटन का रखडले?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल पाच महिन्यांपासून बांधून तयार आहे. मात्र, अद्याप त्याचे उद्‌घाटन का झाले नाही, असा सवाल खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सोमवारी राज्यसभेत उपस्थित केला.

यावर सरकारने केंद्रीय हवाई राज्य मंत्री व्ही. के. सिंग यांनी टर्मिनलचे काम अपूर्ण असल्याने उद्‌घाटन झाले नसल्याचे सांगितले. टर्मिनलवरून सुरू झालेले राजकारण आता राष्ट्रीय पातळीवर पोचले आहे.

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलसाठी सुमारे ४७५ कोटी रुपयांचा खर्च आला. टर्मिनलवरील सर्व कामे झाली आहेत. तरी देखील अद्याप उद्‌घाटन झाले नसल्याने गेल्या महिन्यांपासून काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी निवेदन देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. मात्र, टर्मिनलच्या उद्‌घाटनाचा निर्णय हा पंतप्रधान कार्यालयाकडून घेतला जाणार असल्याने पुणे विमानतळ प्रशासन यात काहीही करू शकत नाही.

‘टर्मिनल’चे उद्‌घाटन होत नसल्याने याचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. प्रवाशांना जुन्या टर्मिनलमधूनच प्रवास करावा लागत आहे. या टर्मिनलवर तुलनेने कमी सुविधा आहेत.