Pune
Pune Tendernama
पुणे

Pune Metro : पुणेकरांना पुणे मेट्रोने दिली Good News! 10 मार्चपासून...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे मेट्रोच्या आठ स्थानकांवर (Pune Metro Stations) दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यासाठी सशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वाहनतळांवर ठेकेदारांचीही (Contractor) नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या स्थानकांवरील वाहनतळ दहा १० मार्चपासून कार्यान्वित होतील.

या सर्व वाहनतळांवर बूम बॅरियर बसविण्यात आले असून, तेथील जागेचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पुरेसा वीज पुरवठा असेल, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. प्रवाशांना वाहनतळांवर ॲपद्वारेही शुल्क भरता येईल. अॅपद्वारे बुकिंग, डिजिटल पेमेंट करता येईल. पार्किंग क्षमता दर्शविणारे डिजिटल बोर्डही असतील.

मेट्रोमधून प्रवास केलेले वैध तिकीट असल्यास प्रवाशांना वाहनतळाच्या शुल्कात २५ टक्के सवलत मिळेल. वाहनतळासाठी महिन्याच्या पासाची सुविधाही उपलब्ध केली जाईल. पार्किंग शुल्कात जीएसटीचा समावेश असेल.

मेट्रोचे त्याच दिवसाचे अधिकृत तिकीट असलेल्या प्रवाशांना पिंपरी चिंचवड-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या मार्गांवर वाहनतळ शुल्कात सवलत मिळेल. मेट्रोचा मासिक पास असलेल्या प्रवाशांनाच वाहनतळाचा मासिक पास मिळेल. वाहनतळावर हेल्मेट ठेवायचे असल्यास २४ तासांसाठी पाच रुपये शुल्क आकारण्यात येईल.

या बाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, आठ मेट्रो स्थानकांवर पार्किंग सुविधा उपलब्ध केल्याने मेट्रो प्रवाशांना नक्कीच फायदा होईल. त्यामुळे प्रवाशांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.

वाहनतळाची सुविधा असलेली स्थानके
१- पिंपरी चिंचवड

२- संत तुकाराम नगर

३- फुगेवाडी

४- बोपोडी

५ - शिवाजीनगर

६ - शिवाजीनगर न्यायालय

७ - मंगळवार पेठ (आरटीओ)

८- आयडियल कॉलनी