Railway
Railway Tendernama
पुणे

Pune : लोणंद-फलटण-बारामती रेल्वे मार्गाबाबत आली Good News

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : लोणंद-फलटण-बारामती (Lonand - Phaltan - Baramati) रेल्वे मार्गावर लोणंद ते फलटण हा मार्ग तयार झालेला आहे. नुकतेच जागेचे संपादन पूर्ण झाल्याने फलटण ते बारामती या मार्गाच्या कामाला फेब्रुवारीच्या आठवड्यात सुरवात होणार आहे. यामध्ये स्लीपर, रूळ टाकण्यापूर्वी ‘अर्थओव्हर’ करण्याचे काम केले जाईल. फलटण-बारामती मार्ग पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

लोणंद-फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. याबरोबरच फलटण ते पंढरपूरदरम्यान नवीन मार्गिकेला नीती आयोगाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करन यादव यांनी शनिवारी फलटण स्थानकाची पाहणी केली.

या वेळी त्यांनी दोन्ही प्रकल्पाचा आढावा घेतला आहे. यावेळी खासदार रणजित नाईक निंबाळकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे उपस्थितीत होते.

लोणंद-फलटण-बारामती या रेल्वे मार्गाला १९९० मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर लोणंद-फलटण रेल्वे मार्ग तयार झाला. फलटण ते बारामती मार्गाला काही दिवसांपूर्वी जागेची उपलब्धता झाल्यामुळे फेब्रुवारी २४ पासून या मार्गावर ‘अर्थओव्हर’ करण्याचे काम केले जाणार आहे.