Vertical Garden
Vertical Garden Tendernama
पुणे

PUNE: मेट्रोचा मार्ग पांघरणार 'हिरवा शालू'; टेंडर प्रक्रिया सुरू

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील (Pune City And Pimpri Chinchwad) २५ किलोमीटर एलिव्हेटेड मेट्रो (Elevated Metro) मार्गांमधील दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याची प्रक्रिया महामेट्रोने (Mahametro) सुरू केली आहे. तसेच दोन्ही शहरांत १२ ठिकाणी व्हर्टिकल गार्डन (Vertical Garden) उभारण्यात येणार आहे.

दोन्ही शहरांत मेट्रोचे सुमारे ८०० खांब आहेत. तसेच २५ किलोमीटर मेट्रो खांबांवरून जाणारी (एलिव्हेटेड) आहे. खांबांखाली असलेल्या दुभाजकांत झाडे लावून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हे करताना मेट्रोवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये म्हणून वाहतूक बेटांच्या (ट्रॅफिक आयलँड) धर्तीवर सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते हॅरिस पूल आणि शिवाजीनगर न्यायालय स्थानक ते रामवाडी स्थानक या भागातील टेंडर प्रक्रिया सध्या सुरू आहे. लवकरच या मार्गांवरही सुशोभीकरण होणार आहे.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे. शहराचा बराचसा भाग दाट झाडीने व्यापला आहे. त्याला सुसंगत म्हणून मेट्रोने सुशोभीकरणाच्या कार्य हाती घेतले आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भरच पडेल.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो