PMC Pune
PMC Pune Tendernama
पुणे

PMC: फुरसुंगी, देवाची उरुळीने जे गमावलं ते 'या' 9 गावांनी कमावले

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिका (PMC) प्रशासनाकडून समाविष्ट २३ गावांच्या विकासाबाबत एकीकडे कमालीची उदासीनता असली, तरी त्यापूर्वी समाविष्ट झालेल्या फुरसुंगी व देवाची उरुळी गावे ही दोन गावे वगळून उर्वरित नऊ गावांमध्ये १८२ किलोमीटरच्या मैलापाणी वाहिन्या टाकण्यापासून ते मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पापर्यंतच्या कामाला चालना मिळाली आ

जानेवारी २०२१ मध्ये ३९२ कोटी रुपयांच्या पूर्वगणकपत्रास मान्यता दिली. त्यामध्ये नवीन मुख्य मलवाहिन्या टाकणे, सध्याच्या मलवाहिन्यांची दुरुस्ती आणि मैलापाणी शुद्धीकरण केंद्र तयार करणे अशा स्वरूपाच्या कामांचा समावेश केला होता. २०२१ मध्ये टेंडर प्रक्रिया राबवून मागील वर्षी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. लोहगाव, धायरी, मुंढवा केशवनगर, आंबेगाव बुद्रुक, मांजरी येथे प्रत्यक्षात मलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. १८२ किलोमीटर मैलापाणी वाहिन्या टाकण्याच्या कामापैकी २८ किलोमीटरचे काम झाले आहे, त्यासाठी आत्तापर्यंत ३० कोटी रुपये इतका खर्च आला आहे. मागील वर्षभरात ही कामे सुमारे ३३ टक्के इतक्‍या प्रमाणात झाली आहेत.

चार वर्षात पूर्ण करणार काम

मुंढवा केशवनगरमध्ये सर्व्हे क्रमांक ९ ते १२ मध्ये १२ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठीची जागा ताब्यात घेतली आहे. तर मांजरी बुद्रुक येथे सर्व्हे क्रमांक २८ मध्ये ९३.५ एमएलडी इतक्‍या क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधले जाणार आहे. मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याचे काम सध्या सुरु आहे. या प्रकल्पासाठी २०२२-२३ च्या अंदाजपत्रकामध्ये १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. हे काम चार वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.

महापालिकेत समाविष्ट ११ पैकी ९ गावांमध्ये मैलापाणी वाहिन्यांच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. ९ गावांमध्ये आत्तापर्यंत ३३ टक्‍क्‍यांपर्यंत काम झाले आहे. उर्वरित कामही सुरु आहे.

- जगदीश खानोरे, अधिक्षक अभियंता, जायका, महापालिका