Chandni Chowk
Chandni Chowk Tendernama
पुणे

Pune: चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे काम झाले अन् आता उद्घाटन..

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandani Chowk) नव्या उड्डाण पुलाच्या आणि रस्त्याच्या उद्‍घाटनाचा मुर्हूत टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या उड्डाण पुलासाठी टाकण्यात येणाऱ्या गर्डरच्या कामासाठी लागणारी साधने वेळेत उपलब्ध झाली नसल्याने पुलाचे काम लांबले आहे. त्यामुळे येत्या १ मे रोजीच्या उद्‍घाटनाचा मुहूर्त टळला आहे.

एनडीए चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाचे खांब उभे करण्यात आले असून खांबांवर टाकल्या जाणाऱ्या आवश्यक गर्डरपैकी काही गर्डरचे काँक्रीटीकरण शिल्लक आहे. त्यासाठी लागणारी साधने, इतर संसाधने वेळेत उपलब्ध झाली नसल्याने कामात व्यत्यय येत झाला. आत्ता संसाधाने उपलब्ध झाली असल्याने उर्वरित गर्डरचे काँक्रीटीकरण सुरू करण्यात आले असल्याची माहिती ‘एनएचएआय’कडून देण्यात आली.

दरम्यान, चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे आणि तेथील रस्त्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. केवळ गर्डर आणि पर्यायी रस्त्यांबाबत कामे शिल्लक होती. त्यानुसार गर्डर टाकण्यापूर्वी या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात दोन-दोन तासांचा बंद करण्याबाबत नियोजन सुरू आहे. बंद घेतल्यानंतर पर्यायी रस्त्यांचे नियोजन करण्यात येत असून मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.