पुणे (Pune) : खेड तालुक्यातील चाकण, आळंदी नगरपरिषद हद्दवाढ गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. ती लालफितीत अडकली आहे. या हद्दवाढीलाही शेजारील गावातील काही गावपुढाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. चाकण, आळंदी या दोन्ही नगरपरिषदांची तसेच लगतच्या गावांची मिळून एकच महापालिका करण्याचे प्रयत्न राज्यसरकारच्या विचाराधीन आहे.
नवीन महापालिका करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी विभागीय आयुक्तांकडून अहवाल आणि अभिप्राय मागविले होते .चाकण,आळंदी नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याबाबत काहींची मागणी आहे. तर चाकण, आळंदी, राजगुरूनगर या तीन नगर परिषदांची मिळून एक महापालिका करण्याचाही प्रस्ताव आहे.