Koregaov Park
Koregaov Park Tendernama
पुणे

पुण्यात कोरेगाव पार्क, प्रभात रोडला राहायचं म्हणजे...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील (Pune City) कोरेगाव पार्क (Koregaon Park) हा परिसर निवासी सदनिका घेण्याच्यादृष्टीने सर्वांत महागडा ठरला आहे. मात्र, या परिसरातील मोकळ्या जागेचा दर मात्र कमी आहे. या उलट उच्चभ्रू वस्तीच्या प्रभात रस्त्यावरील (Prabhat Road) मोकळ्या जमिनींचा दर सर्वाधिक, तर सदनिकांचा दर हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.

कोरेगाव पार्कमधील सदनिकांचा रेडी-रेकनरमधील (Ready Reckoner) दर प्रति चौरस मीटरसाठी १ लाख ७२ हजार ५८० रुपये आणि मोकळ्या जमिनींचा दर ६१ हजार ४० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. तर प्रभात रस्त्यावरील सदनिकांचा दर १ लाख ५४ हजार रुपये प्रति चौरस मीटर असून, मोकळ्या जमिनींचा दर हा ८० हजार २८० प्रति चौरस मीटर एवढा आहे.

उंड्री येथील मोकळ्या जमिनींचा दर सर्वात कमी असून तो ४ हजार ५०० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. तर धानोरी येथील सदनिकांचा दर सर्वांत कमी म्हणजे २७०० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. महापालिका क्षेत्रासाठी रेडी-रेकनरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरात सरासरी ८.१५ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ करताना या परिसरांत मागील दोन वर्षांत झालेले खरेदी-विक्री व्यवहार, परिसराची संभाव्य वाढ, विकसन क्षमता याचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरेगाव पार्क परिसर हा सर्वांत महागडा ठरला आहे.

कोथरूड परिसरात मोकळ्या जागांचा दर हा ४५ हजार रुपये प्रति चौरस मीटर, बाणेरमध्ये ३५ हजार ९०० रुपये प्रति चौरस मीटर तर बालेवाडी परिसरात ३१ हजार ४३० रुपये प्रति चौरस मीटर इतका दर आहे.

पुणे शहरातील विविध भागातील जमिनींचे दर रुपयांमध्ये (प्रति चौरस मीटरसाठी)

ठिकाण - खुली जमीन सदनिका

बालेवाडी - ३१,४३० - ९२,६५०

बाणेर - ३५,९०० - ९५,९४०

हडपसर - २९,७०० - ९८,३००

कोथरूड - ४५,०५० - १,४०,५८०

पाषाण - ३४,१५० - १,१२,७५०

पर्वती - ३७,०१० - १,२८,८१०

कॅन्टोन्मेंट - ५१,२०० - ९७,५६०

वडगाव शेरी - ३०,५८० - ८०,१५०

शनिवार पेठ - ५९,४२० - ९४,०९०

सोमवार पेठ - ४६,१८० - ७७,१६०

रास्ता पेठ - ३५,५४० - ७३,२९०

धानोरी - २०,९६० - ५८,८७०

कसबा पेठ - २९,०१० - ७५,६७०

महंमदवाडी - २५,६८० -७२,९००

आंबेगाव खुर्द - २६,६०० - ७४,६९०

औंध - ४६,१९० - १,२१,७७०

उंड्री - ४,५०० - ३४,०९०