I Love Boards Pune
I Love Boards Pune Tendernama
पुणे

I Don't Love...! पुण्यात 'त्या' नगरसेवकांचा पालिकेकडून 'प्रेमभंग'!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (pune) : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील विविध भागात आय लव्ह...चे फलक लावण्यात आले होते. या ठिकाणी अनेक नागरिक उत्सुकतेपोटी फोटोदेखील काढत होते. मात्र, आता याच बोर्डचं ब्रेक अप होणार आहे. (I Love Kothrud, I Love Katraj, I Love Sarasbag)

होय, शहरातील विविध भागांची शोभा वाढवणारे आय लव्हचे फलकांवर कारवाई केली जाणार आहे. या फलकांमुळे शहाराचे ससुशोभीकरणाऐवजी विद्रुपीकरण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. वाढत्या तक्रारींनंतर अखेर या फलकांविरोधात पुणे महानगरपालिकेने यावर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले बहुतांश फलक हे कोणत्याही परवानगीशिवाय उभारण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे शहाराची शोभा वाढण्याऐवजी शहाराच्या विद्रुपीकरणात वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने पालिकेकडे केल्या जात होत्या.

या सर्व तक्रारींची दखल घेत आता संबंधित विभागाला हे बोर्ड काढून टाकण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. अशा प्रकारचा एक बोर्ड उभारण्यासाठी बोर्डच्या आकारमानानुसार साधारण 3 ते 10 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. मात्र आता हे काढण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे आय लव्ह कात्रज ते आय लव्ह सारसबागचे ब्रेकअप होणार आहे.