Double Decker Bus
Double Decker Bus Tendernama
पुणे

Good News : मुंबई नंतर महाराष्ट्रातील 'या' शहरांत धावणार डबल डेकर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पीएमपी (PMP) प्रशासनाने पहिल्या टप्यात २० डबलडेकर बस (Double Decker Bus) खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. पुणे महापालिकेने (PMP) १२, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) ८ बस खरेदी कराव्यात, असे प्रस्तावात म्हटले आहे. येत्या १६ फेब्रुवारीला पीएमपीची बोर्ड मीटिंग आहे. यात डबलडेकर बस खरेदीवर चर्चा होऊन निर्णय अपेक्षित आहे. डबलडेकर बसला मंजुरी मिळेल, हे जवळपास निश्चित आहे.

शहरांतील गर्दीच्या मार्गांवर अपुरी पडणारी बससंख्या लक्षात घेता पीएमपी प्रशासनाने डबलडेकर बस घेण्याचा विचार केला. त्यासाठी मार्गांचे सर्वेक्षण केले. त्याआधारे ४० मार्गांवर डबलडेकर चालविण्याची तयारी पीएमपी प्रशासनाने दर्शवली. बस खरेदीचा विषय दोन्ही महापालिकेच्या अखत्यारीत येणार असल्याने पीएमपी प्रशासनाने त्याचा प्रस्ताव दोन्ही महापालिकांपुढे ठेवला आहे. डबलडेकर बसची किंमत सुमारे २ कोटी रुपये इतकी आहे.

या मार्गांवर धावणार डबलडेकर :
हडपसर-पुणे महापालिका
हडपसर-कात्रज
भोसरी-आळंदी
भोसरी-निगडी
कात्रज-हिंजवडी
पुणे महापालिका-बालेवाडी
पुणे स्टेशन-कोथरूड
हडपसर-कोथरूड
हडपसर-वारजे, माळेवाडी

कशी असेल डबलडेकर बस
- नव्या बसला दोन जिने
- इलेक्ट्रिक व वातानुकूलित
- बसमध्ये उत्तम सस्पेन्शन
- प्रवास आरामदायक
- बसमध्ये डिजिटल तिकिटांची सोय
- लंडनमध्ये धावणाऱ्या बससारखा लुक

असे असेल स्वरूप
- प्रवासी क्षमता : सीटिंग ७० पर्यंत, उभे राहून ४०
- एकावेळी किमान शंभरहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील
- पीएमपीला जास्त बसची अथवा फेऱ्यांची गरज भासणार नाही
- बसची किंमत २ कोटी रुपये
- बसची उंची १४ फूट ४ इंच
- नवीन बस इलेक्ट्रिक, त्यामुळे देखभालीचा खर्च कमी