Trees File
Trees File Tendernama
पुणे

G-20 Pune: झाडांचे गौडबंगाल! CSR नव्हे 'ती' तर ठेकेदाराची कमाल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : G_20 परिषदेच्या बैठकीसाठी सुशोभीकरणाकरिता उभारलेल्या शोभेच्या कृत्रिम झाडांसाठी (Lumino Trees) सामाजिक उत्तरदायित्वद्वारे (CSR) नव्हे, तर ठेकेदारांच्या (Contractor) माध्यमातून लावल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित कृत्रिम झाडे ही ‘सीएसआर’अंतर्गत उभी केल्याचे यापूर्वी सांगितले होते.

शहरात नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेच्या बैठकीसाठी महापालिकेने शहरातील ५४ ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण, विद्युत रोषणाई केली होती. महापालिकेच्या विद्युत विभागाने काही रस्त्यांवर, चौकातील खांबाना, झाडांवर विद्युत रोषणाई केली होती. तसेच ११ ठिकाणी आकर्षित लुमिनो ट्रीदेखील लावले होते. ही बैठक संपल्यानंतर संबंधित झाडे ही महापालिकेकडून काढण्यात आली.

दरम्यान, विविध ठिकाणी लावलेल्या या कृत्रिम झाडांसाठी ‘सीएसआर’चा वापर केल्याचे प्रारंभी सांगितले होते. आता मात्र ही झाडे ठेकेदारांमार्फत लावल्याची माहिती पुढे आली आहे. त्यासाठी एकूण किती खर्च आला, तो कोणी केला याबाबतची उत्तरे अद्याप मिळाली नाहीत.