कोल्हापूर (Kolhapur) : रत्नागिरी-नागपूर (Ratnagiri-Nagpur) महामार्गासाठी टेंडर (Tender) दाखल करण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढविण्यात आली. ८ फेब्रुवारीपर्यंत असलेली ही मुदत आता पुन्हा एकदा २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
रत्नागिरी-नागपूर चौपदरी महामार्गासाठी २५ जानेवारीपर्यंत टेंडर दाखल करण्यासाठी मुदत होती. मात्र अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा आठ फेब्रुवारीपर्यंतही मुदत वाढविण्यात आली होती. त्यामुळे तुर्तात कामाची सुरवात होण्यास आणखी विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
आठ फेब्रुवारीला उघडण्यात येणारी टेंडरची मुदत पुन्हा २२ फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. कोणत्या कारणामुळे ही प्रक्रीया होऊ शकली नाही याचे कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या स्थानिक कार्यालयात उपलब्ध नाही. संबंधित सर्व प्रक्रिया दिल्लीतील कार्यालयातून होत असल्यामुळे केवळ मुदतवाढ दिल्याची माहिती येथून देण्यात आली.