Narendra Modi Tendernama
मुंबई

मुंबईतील 'त्या' प्रकल्पाचे 30 सप्टेंबरला PM Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन

Devendra Fadnavis: वरळी ते कफ परेड पर्यंतच्या भूमिगत मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): ठाकरे बंधूंवर निशाणा साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की भाजप (BJP) पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे मुंबईची पुनर्कल्पना करत असताना, काही लोक फक्त खुर्चीसाठी पुनर्कल्पना करत आहेत. मात्र त्यांना ती खुर्ची मिळणार नाही. महायुती मुंबईवर भगवा झेंडा फडकवेल आणि बीएमसीमध्ये महायुतीचा महापौर असेल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी वरळी ते कफ परेड पर्यंतच्या भूमिगत मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी ३० सप्टेंबर रोजी मुंबईत येतील आणि मेट्रो ३ च्या उर्वरित टप्प्याचे उद्घाटन करतील, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

फडणवीस यांनी एनएससीआय डोम येथे झालेल्या मुंबई भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मुंबईच्या परिवर्तनासाठी पक्षाचा रोडमॅप कार्यकाऱ्यांसमोर मांडला.

आता ते ब्रँडबद्दल बोलतात. बाळासाहेब ठाकरे हे एक ब्रँड होते. फक्त नाव जोडल्याने कोणी ब्रँड बनत नाही. अमीत साटम सारखा पक्षाचा कार्यकर्ता मुंबई भाजप अध्यक्ष बनला आहे. एक चहा विकणारा कार्यकर्ता एक जागतिक ब्रँड बनला आहे जो आपल्यासोबत आहे - तो म्हणजे नरेंद्र मोदी, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यावेळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास, गिरणी कामगारांसाठी घरे, मेट्रो विकास प्रकल्प, स्वयं-वित्तपुरवठा पुनर्विकास गृहनिर्माण, मेट्रो नेटवर्क, किनारी रस्ते, पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी, मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क मजबूत करणे, एमएमआर प्रदेशातील तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईचा विकास, वाढवन बंदर इत्यादींच्या विकासकामाबद्दल बोलले. 

फडणवीस पुढे म्हणाले की, आपण पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे मुंबईची पुनर्कल्पना करत असताना, काही लोक फक्त खुर्चीसाठी पुनर्कल्पना करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांना ती खुर्ची मिळणार नाही - ती एका मुंबईकराकडे जाईल जो शहराच्या हितासाठी काम करेल. मी तुम्हाला खात्री देतो की जो बीएमसीला भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कारभारातून बाहेर काढेल तोच मुंबईचा महापौर होईल.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि अंधेरी (पश्चिम) येथील आमदार अमीत साटम यांनी सांगितले की, मुंबईचा रंग बदलण्याच्या कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल. पश्चिमेकडील अनेक आंतरराष्ट्रीय शहरांचे रंग बदलताना आपण पाहतोय. तसेच मुंबईतही असेच प्रयत्न सुरू आहेत. असे प्रयत्न आपण यशस्वी होऊ देणार नाही.

गेल्या ११ वर्षात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मुंबईचा विकास झाला आहे, तोच विकास बीएमसीच्या माध्यमातूनही झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊ, मुंबईकरांची सुरक्षितता सुनिश्चित करू आणि मुंबईची ओळख टिकवण्यासाठी तसेच ती संरक्षित करण्यासाठी प्रयत्न करू, असे साटम म्हणाले.