road
road Tendernama
मुंबई

गणेशोत्सवात मुंबई महापालिकेने बुजविले तब्बल ६ हजार खड्डे अन् खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांचा गणेशोत्सव खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल सहा हजार खड्डे बुजवले. हे खड्डे बुजवण्यासाठी 'रॅपिड हार्डनिंग काँक्रीट' या नव्या तंत्रज्ञानासह 'कोल्ड मिक्स'चा वापर करण्यात आला. नव्या तंत्रज्ञानात अवघ्या सहा तासांत संबंधित मार्गावरून वाहतूक सुरू करता आली. या कामासाठी महापालिकेने पाच कोटींचा खर्च केला आहे.

गणेशोत्सवात मोठय़ा संख्येने निघणाऱ्या विसर्जन मिरवणूक मार्गाकरील खड्ड्यांचे महापालिकेसमोर आक्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीकर महापालिकेने नव्या तंत्रज्ञानाने खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. यासाठी गोदरेज आणि अल्ट्राटेक कंपनीकडून रॅपिड हार्डनिंग काँक्रीट घेण्यात आले. या काँक्रीटच्या वापरानंतर रस्त्याकर वाहतूक सुरू करण्यासाठी सहा तासांचा केळ लागत असल्याने रात्रीच्या केळी काम करण्यावर भर देण्यात आला. शिकाय भरपावसातही खड्डे भरता येणाऱ्या कोल्डमिक्सचा वापरही वॉर्ड स्तरावर करण्यात आला. यासाठी 24 वॉर्डमध्ये तीन हजार 'कोल्डमिक्स'चा पुरकठा पावसाळ्याआधीच करण्यात आला आहे.

गणेशोत्सवादरम्यान कमी कालावधीत टेंडर काढून खड्डे बुजवण्याचे काम देणे शक्य नसल्याने हमी कालावधीत नसलेल्या रस्त्यांची कामे जुन्याच कंत्राटदारांकडून करून घेण्यात आली. नव्या तंत्रज्ञानाने खड्डे भरण्यासाठी महापालिकेने मुंबई शहर 1 कोटी, पूर्व उपनगर 2 कोटी आणि पश्चिम उपनगरासाठी 2 कोटींचा खर्च केला. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी महापालिकेने एप्रिलपासूनच खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये 'हमी कालावधी'मधील रस्त्यांची कामे कंत्राटदारांकडून तर हमी कालावधी नसलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मध्यवर्ती यंत्रणा आणि वॉर्ड स्तरावर करण्यात आली. यामध्ये 1 एप्रिलपासून आतापर्यंत महापालिकेच्या माध्यमातून 36 हजार खड्डे बुजवण्यात आले.