Gate way of india
Gate way of india Tendernama
मुंबई

'गेट वे'चा चेहरा मोहरा बदलणार; १६ कोटींचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाचा चेहरा मोहरा लवकरच बदलणार आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून पदपथाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका १६ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या कामाचा नुकताच आढावा घेतला. यानंतर मुंबईचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे निर्देश शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले. त्यानंतर मुंबईचे डिसेंबर अखेरपर्यंत ५० टक्के तर मार्च २०२३ पर्यंत ५० टक्के सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा पहिला टप्पा म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथून सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यात पदपथाचे सौंदर्यीकरण, रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई, आकर्षक झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल ठोंबरे यांनी दिली.