Parking App
Parking App Tendernama
मुंबई

मुंबईत पार्किंगचे टेन्शन आता विसरा; बीएमसीचा असाही फंडा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईत पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने खासगी सोसायट्या, म्हाडा, सरकारी-खासगी कार्यालयांच्या मोकळ्या जागेत पार्किंगची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. सध्या माटुंगा व मुंबादेवी या दोन्ही ठिकाणी 18 मजली इमारती उभारल्या जात असून त्यात अत्याधुनिक स्वयंचलित पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे शटर आणि रोबो पार्क करता येतील अशा प्रकारच्या यांत्रिक वाहनतळाची निर्मिती केली जात आहे.

मुंबईचा नागरी आणि औद्योगिक विकास झपाट्याने होत असताना दिवसाला शेकडो गाड्यांची भर पडत आहे. यामध्ये चारचाकी वाहनांसह दुचाकीचीही भर पडते, मात्र ही वाहने पार्क करणार कुठे असा प्रश्न निर्माण होते. मुंबईबाहेर जाताना आपली कार किंवा कोणतेही वाहन पार्क करण्यासाठी पालिकेची पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे वाहन चोरीला जाण्याचा प्रश्न मिटणार असून पालिकेच्या पार्किंगमध्ये वाहन सुरक्षितरीत्या ठेवले जाणार आहे.

माटुंगा व मुंबादेवी या दोन्ही ठिकाणी 18 मजली इमारती उभारत त्यात अत्याधुनिक स्वयंचलित पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. बहुमजली वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर स्वयंचलित पद्धतीने कारची नोंद झाल्यानंतर पोलादी प्लेटवर कार उभी केली जाणार आहे. यानंतर तब्बल 21 मजली वाहनतळामध्ये लिफ्टमध्ये ती कार स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाईल. मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे शटर आणि रोबो पार्क करता येतील अशा प्रकारच्या यांत्रिक वाहनतळाची निर्मिती केली जात आहे. शटर आणि रोबो पार्क पद्धतीनुसार बांधण्यात येणाऱ्या या वाहनतळामध्ये माटुंगा पूर्व येथे 475 वाहन क्षमता आणि मुंबादेवीजवळील जागेमध्ये 546 क्षमता असेल. या दोन्ही ठिकाणी 18 मजल्याच्या वाहनतळाची उभारणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे नागरिकांना ऑनलाइन पार्किंग बुकिंग करता यावे यासाठी मुंबई महापालिका विशेष ऍप उपलब्ध करुन देणार आहे.