MMRDA
MMRDA Tendernama
मुंबई

साडेतीन किमीच्या भूमिगत मार्गासाठी नेमणार सल्लागार; MMRDAचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) पी. डीमेलो मार्ग ते गिरगाव चौपाटी दरम्यान साडेतीन किमी लांबीचा भूमिगत मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून बृहत् आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. एमएमआरडीएने याचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना पी डिमेलो मार्गावरून मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी येथे पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लवकरच हा प्रवास वेगवान होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यासाठी पुढाकार घेतला आहे. पी. डीमेलो मार्ग ते गिरगाव चौपाटी दरम्यान साडेतीन किमी लांबीचा भूमिगत मार्ग तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून बृहत् आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी टेंडर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या प्रकल्पामुळे पी डिमेलो मार्ग ते गिरगाव चौपाटी अंतर केवळ पाच मिनिटांत पार करता येईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. अंदाजे साडेतीन किमी लांबीचा हा भूमिगत मार्ग असेल.