Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
मुंबई

पुणे म्हाडाच्या ५,२११ घरांची ऑनलाईन सोडत; कोण आहेत भाग्यवान?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : म्हाडा (MHADA) पुणे मंडळाच्या ५,२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आरंभ झाला.

दिवसेंदिवस घरे महाग होत असल्यामुळे, रिअल इस्टेटचे दर वाढतच चालल्यामुळे सर्वसामान्यांना घर विकत घेणे अशक्य होत चालले आहे. म्हाडाच्या सोडतीमुळे सर्वसामान्य माणसांना त्यांचे हक्काचे घर मिळणे सोपे होते. त्यामुळे सर्वांचेच लक्ष म्हाडाच्या सोडतीकडे लागलेले असते. म्हाडा राज्याच्या विविध भागात सर्वसामान्यांसाठी परवणाऱ्या दरात घरे उपलब्ध करुन देत असते.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांसाठी म्हाडा ही सोडत काढत आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनतील २७८ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आरंभ झाला. त्यामुळे या शहरांमधील हजारो सर्वसामान्यांना त्यांचे स्वत:चे हक्काचे घर मिळणार आहे. विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित आहेत.