Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
मुंबई

शिंदे सरकारच्या कामाचा झपाटा; जनहिताच्या 399 फायलींचा...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्य सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेला वेग आला असून, नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेतले आहेत. १ जुलै ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे आठ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 399 फायलींचा निपटारा केला आहे. (Eknath Shinde - Devendra Phadnavis)

विशेष म्हणजे, यात नैसर्गिक आपत्तीमधील मदत, गरजूंना मदत, कृषी विभाग, मंत्रिमंडळासमोर अनावयाचे प्रस्ताव, फायली, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फायलींचा यात समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागांच्या सचिवांना सर्वसामान्यांची, तसेच जनहिताची कामे गतिमान रीतीने झाली पाहिजेत, तसेच लोकांची कामे अडणार नाहीत, हे पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनहितासाठी तत्परतेने निर्णय घेण्यात येत आहेत.