BMC
BMC Tendernama
मुंबई

BMCचा मोठा प्लान; ग्रँटरोड-इर्स्टन फ्रीवे अंतर अवघ्या 5 मिनिटांत

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ग्रँटरोड ते इर्स्टन फ्रीवे (Grand Road To Eastern Freeway) हे अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) यादरम्यान उन्नत मार्ग बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार केली आहे. सध्या ग्रँटरोड ते इर्स्टन फ्रीवेला जाण्यासाठी तीस ते पन्नास मिनिटे लागतात. आता हेच अंतर पाच ते सात मिनिटांत पार करण्याचे नियोजन आहे.

या निर्णयामुळे दक्षिण मुंबईच्या उत्तर टोकाकडून इस्टर्न फ्रीवेला झटपट पोहोचता येणार आहे. हा नवा उन्नत मार्ग फ्रीवेच्या ऑरेंज गेटपासून सुरू होऊन जे. राठोड रोड – हँकॉक ब्रिज – जे. जे. उड्डाण पुलाच्यावरून मौलाना शौकत अली रोड - फेरेरे ब्रिजच्या पूर्वेला संपेल. मुंबई महापालिका लवकरच या मार्गासाठी टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू करणार आहे.

मुंबईतील ग्रँटरोड परीसरातून दक्षिण मुंबईतील फ्रीवेला पोहचण्यासाठी उन्नत मार्ग बांधण्याची योजना आहे. या योजनेमुळे सध्या लागणार 30 ते 50 मिनिटांचा कालावधी अवघ्या पाच ते सात मिनिटांवर येणार आहे. न्हावाशेवा ते शिवडी ट्रान्सहार्बर हार्बर लिंकशी हा मार्ग कनेक्ट करण्याची योजना आहे. त्यामुळे ग्रँटरोड, मलबार हील आणि ताडदेव परिसराला नवी मुंबई विमानतळाशी कनेक्ट करता येणार आहे.

एमएमआरडीएने मरीनड्राईव्ह ते फ्रिवे बोगद्याने कनेक्ट करण्याची योजना आखली आहे. त्यानंतर बीएमसीने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीने फ्रीवे ते मरीनड्राईव्ह भुयारी टनेल बांधल्यावर आमचा उन्नत मार्ग साऊथ मुंबईतील इतर रहिवाशांच्या फायद्याचा ठरणार असल्याचे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक बाबी क्लिअर झाल्यावर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांकडे जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

ही योजना पालिका आयुक्तांकडून एकदा का मंजूर झाली की लवकरच टेंडर काढले जाईल, असेही त्यांनी सांगितले. फ्रीवे ऑरेंज गेटने मानखुर्दशी जोडला गेला आहे. तेथे देवनार आणि भक्तीमार्ग असे दोन फाटे आहेत. तो 2014 मध्ये बांधला होता. यामुळे दक्षिण मुंबईचे पूर्व उपनगराशी, तसेच नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि इतर भागाशी कनेक्ट झाले आहे.

आता शिवडी ते न्हावासेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे नवी मुंबई एअरपोर्ट आणि जेएनपीटीशी कनेक्ट केला जाणार आहे. त्यामुळे फ्रीवेचे ट्रॅफीक वाढणार आहे. 5.5 किमीचा उन्नत मार्ग हे ट्रॅफीक दूर करण्यास मदत करेल. 30 ते 50 मिनिटांचे अंतर अवघ्या पाच ते सात मिनिटावर येईल असे त्यांनी स्पष्ट केले. हा नवा उन्नत मार्ग फ्रीवेच्या ऑरेंज गेटपासून सुरू होऊन जे. राठोड रोड – हँकॉक ब्रिज – जे. जे. उड्डाण पुलाच्या वरून मौलाना शौकत अली रोड - फेरेरे ब्रिजच्या पूर्वेला संपेल.