Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg Tendernama
मुंबई

समृद्धी महामार्गाबद्दल मोठी बातमी; अखेर 'हा' टप्पाही पूर्ण...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरचा प्रवास सध्या नागरिकांना करता येत असून, दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे.

२०२३ या नवीन वर्षाच्या अखेर शिर्डी-मुंबई या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सांगितले. नागपूर ते सिन्नरपर्यंतचे काम फेब्रुवारीअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. भरवीरपर्यंत मार्चअखेर, इगतपुरी मे महिन्याच्या शेवटपर्यंत आणि ठाण्यापर्यंतचे उर्वरित काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण होण्याचा अंदाज आहे.