Dhananjay Munde
Dhananjay Munde Tendernama
मुंबई

कृषिमंत्री होताच धनंजय मुंडेंची बीडसाठी मोठी घोषणा; 15 कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना कायम सर्वप्रकारची मदत एकाच छताखाली मिळावी या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, बीड येथील पालवन रोड परिसरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे कृषी भवन इमारत उभारणीसाठी १४  कोटी ९० लाख रुपये निधी खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

पालवण रोडवरील कृषी विभागाच्या क्षेत्रात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व संबंधित आठ विभागांचे अधिनस्त कार्यालय आहेत तर उर्वरित कार्यालय हे शहरातील अन्य ठिकाणी आहेत. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येऊन शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत व योजनांची माहिती व पूरक समस्यांचे समाधान एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी कृषी भवन बांधण्याचा प्रस्ताव धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून मागवला होता.

जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तांमार्फत पाठवलेल्या या प्रस्तावास कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार मान्यता देण्यात आली असून आता बीड जिल्हा कृषी भवन बांधण्यासाठी तब्बल १४ कोटी ९० लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लवकरच कृषी भवनच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येणार आहे.