Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : पाच ठिकाणी स्मार्ट टॉयलेट्स

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिका व स्मार्ट सिटी ह्यांचा खाजगी संस्थांसोबत समन्वयाने शहरात 5 ठिकाणी स्मार्ट टॉयलेट्स उभे करण्यात येत आहे. हे सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे.

खाजगी सहभागाद्वारे शहराचा सौंदर्यात भर पडावी आणि सार्वजनिक सुविधा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत विशेष पथक नेमण्यात आला आहे. स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, आदित्य तिवारी आणि अर्पिता शरद ह्यांचा समावेश असलेला हा पथक खाजगी संस्थांचा मदतीने सी एस आर अंतर्गत शहरात सौंदर्यीकरण व सुविधा सुधारण्यासाठी समन्वयाचा काम करतो. ह्याच उपक्रमांतर्गत आयसीआयसीआय बँकेकडून शहर अभियंता ए. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 5 ठिकाणी स्मार्ट टॉयलेट्स उभारण्याचे काम घेण्यात आले.

सौरभ जोशी यांनी सांगितले की औरंगाबाद लेण्या, सोनेरी महल, सिध्दार्थ गार्डन प्राणि संग्रहालय, नेहरू गार्डन व छावणी येथे स्मार्ट टॉयलेट्स बसवण्यात येत आहे. काही ठिकाणी काम पूर्ण झाला असून तिथे सार्वजनिक शौचालय कार्यान्वित झाले आहे. स्मार्ट टॉयलेट्स स्टील चे बनलेले आहेत आणि ह्यामध्ये मध्ये महिला व पुरुषांसाठी एक एक ब्लॉक देण्यात आला आहे. 10 वेळेस वापर झाल्यानंतर स्मार्ट टॉयलेट्स मध्ये असलेल्या सिस्टीम द्वारे आपोआप स्वच्छता होत असल्यामुळे ह्याचा नाव स्मार्ट टॉयलेट्स देण्यात आला आहे. ह्यासाठी पूर्व मनपा आयुक्त आणि स्मार्ट सिटी सीईओ डॉ. अभिजित चौधरी ह्यांनी शहरातील बँक अधिकारी ह्यांचासोबत बैठक घेऊन शहरात मनपा प्रशासनाला सीएसआर अंतर्गत मदत करण्यासाठी आवाहन केले होते. आयसीआयसीआय बँकेकडून अक्षय कुलकर्णी व गौरव शिंगोटे हे स्मार्ट टॉयलेट्स बसवण्यासाठी समन्वय साधत आहेत.