Aurangabad
Tendernama
औरंगाबाद (Aurangabad) : महापालिकेचे प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय म्हणजे चाराण्याची तिजोरी बाराण्याच्या आत्मनिर्भरतेच्या गप्पा असेच म्हणावे लागेल. गेल्या वर्षी त्यांनी कंत्राटदार, नगरसेवक, अधिकार्यांच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी महापालिका शहरातील काही उद्योजकांच्या सहभागाने नाले स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा खरेदी करून स्वतःच नालेसफाई करणार असल्याची घोषणा हवेतच विरली आहे.
कंत्राटदार, नगरसेवक आणि अधिकार्यांच्या साखळीला मोडीत काढण्यासाठी महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पालिकेचीच स्वतःची यंत्रणा उभारून शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या चांगल्या निर्णयाने पालिकेने आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने उचलेले पाऊल मानले जात होते. त्यांच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी पालिकेने अंमलबजावणीही सुरू केली होती. मात्र नाल्यांच्या स्वच्छतेसाठी लागणारी वाहने खरेदीची अद्यापही उभी केली गेली नाहीत.
पालिका आयुक्त पाण्डेय यांनी गत वर्षी पालिकेच्या माध्यमातूनच नाला स्वच्छतेचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. सद्यस्थितीत नालेसफाईसाठी महापालिकेकडे केवळ एक जेसीबी मशीन, पोकलेन आणि टिप्पर अशी तोकडी यंत्रणा आहे. यासाठी महापालिका यंदाही कंत्राटदारांकडुन भाडेतत्वावर यंत्रणा घेऊन त्यातून नालेसफाई उरकली जात असे. मात्र, यात काही स्थानिक लोकप्रतिनिधींची आणि कंत्राटदाराच्या खाबुगिरीने नालेसफाई फक्त मेजरमेंट बुकातच लिहीली जाऊन कोट्यावधीची वसुली केली जात असे.
गेल्या वर्षी प्रशासक पांण्डेय यांच्या आदेशाने याकामी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईकडून काही जेसीबी व टिप्परची मदत घेण्यात आली होती. पालिकेने या वाहनांच्या इंधनाचा खर्च केला होता. अन्य खर्चाला फाटा देत महापालिकेने नाला स्वच्छता केल्याचा दावा केला आहे. मात्र टेंडरनामा प्रतिनिधीने सलग आठ दिवस शहरातील नाल्यांची पाहणी केली असता यापूर्वी पेक्षा विदारक चित्र शहरातील नाल्यात दिसत आहे.
प्रशासकांच्या नुसत्याच गप्पा
शहरातील नाले स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाने कुठलेही नियोजन केले नाही. याविषयी आयुक्त पाण्डेय यांनी सांगितलेल्या कोणत्याही सूचनांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी केली नाही. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातूनच यापुढे नाल्यांच्या स्वच्छतेची कामे केली जातीय असा निर्णय घेणाऱ्या आस्तीककुमार पाण्डेय यांचा प्रयोग फसला. विशेष म्हणजे, पावसाळा संपल्यावर देखील आवश्यकतेनुसार नाल्यांची स्वच्छता स्वतःच्या यंत्रणेमुळे केली जातील. नाला स्वच्छतेच्या कामावर अधिकचा पैसा खर्च न करता आहे त्या साधनसामुग्रीतूनच हे काम केले जाईल, असेही पाण्डेय यांनी स्पष्ट केले होते. याऊलट शहरातील नाल्यांत अधिकची बकाली वाढलेली दिसत आहे.