Super Speciality Hospital
Super Speciality Hospital Tendernama
कोकण

Raigad : रायगड जिल्ह्यासाठी महत्त्वाची बातमी; 'या' ठिकाणी सुरू होणार 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील मौजे केंबुर्ली येथे २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हे रुग्णालय २५ एकर जागेवर उभारले जाईल.

कोकण महामार्गांवर अनेकवेळा मोठे अपघात झाल्यावर जखमींना पनवेल किंवा मुंबई येथे नेऊन उपचार करावे लागतात. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. रायगड जिल्ह्यात महाड-पोलादपूर येथे छोटी छोटी आरोग्य केंद्रे उपलब्ध आहेत. मात्र तेथे सुसज्ज यंत्रसामुग्री नसल्याने नागरिकांची गैरसोय होते.

पोलादपूर येथे उपजिल्हा आरोग्य केंद्र आहे. महाड येथे ट्रामा केअर सेंटर आहे. परंतु तेथे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यानुसार शासनाच्या आरोग्य विभागाकडून रुग्णालयाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

विधानपरिषदेतील भाजपचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे या रुग्णालयासाठी पाठपुरावा केला. नुकताच यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे दरेकर यांच्याकडून सांगण्यात आले.