Road
Road Tendernama
कोकण

रत्नागिरी ते नागपूर चौपदरीकरणाच्या कामासाठी १८ कंपन्या उत्सुक

टेंडरनामा ब्युरो

कोल्हापूर (Kolhapue) : रत्नागिरी (Ratnagiri) ते नागपूर (Nagpur) या महामार्गाच्या चौपदरी कामासाठी एकूण १८ कंपन्यांनी टेंडर दाखल करून उत्सुकता दाखविली आहे. टेंडर दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. आजपर्यंत दोन वेळा या टेंडर प्रक्रीयेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे मुदत वाढविण्यात आली होती.

रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ च्या चौपदरीकरणासाठी टेंडर मागविण्यात आल्या होत्या. अखेरच्या दिवसापर्यंत १८ कंपन्यांनी टेंडर सादर केले. मात्र आता तांत्रिक आणि कायदेशीबाबींची तपासणी होऊन पुढील प्रक्रीया पूर्ण होईल. त्यानंतर नेमके कोणत्या कंपनीला कामाचा ठेका दिला जाणार हे स्पष्ट होणार आहे.

तब्बल १४ कंपन्यांनी एकाच दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारीला टेंडर दाखल केले आहे. तर १८ आणि २० फेब्रुवारीला प्रत्येकी एक तर १९ फेब्रुवारीला दोन टेंडर दाखल झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली. दरम्यान महामार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी १८, दुसऱ्या टप्प्यासाठी १८ तर तिसऱ्या टप्प्यासाठी १५ कंपन्यांनी टेंडर दाखल केले आहे.