तगादा : आलीशान वसाहती शेजारच्या उद्यानाची 'वाट' कोणी लावली?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : श्रेयनगर परिसरात मंगल कलश आणि वसंत विहार सोसायटी ही शासकीय अधिकारी, उद्योजक, वकीलांची घरे असलेली मोठी आलीशान बंगल्यांची वसाहत आहे. याच वसाहतीत छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे एक सेवानिवृत्त न्यायमूर्ती राहतात. येथील रहिवाशी नियमानुसार मोठा सेवाकर महापालिकेकडे आगाऊ भरतात. त्यानुसार त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, या वसाहतीतील स्वच्छतेची परिस्थिती लाज वाटावी अशी आहे.

Sambhajinagar
Nashik : सिन्नर-शिर्डी 45 किमी प्रवासासाठी भरावा लागणार एवढा टोल

या दोन्ही वसाहतधारकांसाठी एकमेव असलेल्या उद्यानात समस्यांची बजबजपुरी झाली आहे. कचरामय उद्यानात व्यापलेल्या रानटी झाडाझुडपांसह गाजरगवताने गंज चढलेल्या लाखोच्या खेळण्या दिसेनाशा झाल्या आहेत. रस्त्यांची अवस्था तर न व्यक्त केलेलीच बरी. याच वसाहतीलगत विहिरीतून थेट झाडी उगवल्याचा चमत्कार देखील 'टेंडरनामा'च्या पाहणीत समोर आला आहे.

Sambhajinagar
गडकरी, फडणवीसांचा नागपुरात घोषणांचा 'डबल बार'; पुढील 2 महिन्यांत..

वसाहतीत कचऱ्याचे ढिग पसरलेले दिसतात. डास निर्मुलनासाठी कधीही ओस पडलेल्या बागेत आणि परिसरात किटकनाशक औषध फवारणी देखील केली जात नाही. जिकडे तिकडे कचऱ्याचे ढीग पडलेले असतात. मात्र कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याला हे सगळे थांबविण्यासाठी पुढे यावे असे वाटत नाही, याची खंत येथील रहिवासी व्यक्त करताना दिसत आहेत.

शहरात राहून ग्रामीण भागासारखी परिस्थिती असल्याचे म्हणत येथील रहिवाशांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com