सरकार बदलले अन् भाजप आमदारांच्या मतदारसंघात वाढला निधीचा ओघ

Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath ShindeTendernama

नागपूर (Nagpur) : राज्यात सत्ता बदलाचे परिणाम दिसू लागले असून भाजप (BJP) आमदारांच्या मतदारसंघात पैशाचा ओघ वाढू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी कोट्‍यवधीच्या पुरवण्या मागण्यांना विधानसभेने मंजुरी दिली असून त्यात नागपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाला कोट्‍यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. यात दोन मतदार संघात भाजपचे तर एका मतदारसंघात शिंदे गटाचा आमदार आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
'पायोनियर'चा आर्थिक बोजा राज्यातील ग्राहकांवर?2000 कोटींचा घोटाळा

राज्यात आता शिंदे सेना आणि भाजपचे सरकार आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखाते आहे. ते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात विदर्भातील जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात केली. एकदा नव्हे तर दोनदा कपात करून विदर्भावर अन्याय केल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला. त्यामुळेच सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्याच्या नियोजन आराखड्याला स्थगिती दिली होती. यापैकी चालू वर्षांतील खर्चाला मंजुरी दिली आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
वीज मंडळ खासगीकरणाबाबत सरकारची मोठी घोषणा; कंत्राटी कामगारांना...

मात्र, अद्यापही मागील वर्षी मिळालेल्या निधीवरचे बंधन हटवण्यात आली नाहीत. त्यामुळे अन्याय झालेल्या जिल्ह्यांना नव्याने निधी देण्यात येणार असल्याचे समजते. हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील कामठी, हिंगणा आणि रामटेक विधानसभा मतदारसंघाला सरासरी दीड कोटी रुपये देण्यात आले आहे. निधी वाटपाची आकडेवारी अद्याप पूर्णपणे समोर यायची आहे.  मात्र हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे आणि कामठी टेकचंद सावरकर हे दोन्ही भाजपचे आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल आहेत. ते शिंदे गटाचे आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com