ठेकेदार कामे अर्ध्यातच सोडत असल्याने 'जल जीवन'साठी नवी युक्ती

Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionTendernama

नागपूर (Nagpur) : निकृष्ट दर्जा आणि काही ठेकेदार अर्ध्यातच कामे सोडून जात असल्याने जल जीवन मिशनची (Jal Jeevan Mission) कामांसाठी कमी दराचे टेंडर सादर करणाऱ्या ठेकेदारांकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव घेण्यात येत आहे. टेंडर प्रक्रियामध्ये कंत्राटदार नियुक्तीच्या आधी आवश्यक बीड कॅपेसिटी तपासली जात आहे.

Jal Jeevan Mission
नागपूर जिल्ह्यात तब्बल एक हजार हेक्टर जागेत आणखी एक एमआयडीसी

सरकारी योजनांच्या कामाचा दर्जा निकृष्ट असतो. अनेकदा कामे रेंगाळत ठेवली जातात. त्यामुळे वर्षानुवर्षे योजना पूर्णच होत नाही. नंतर अनेक तांत्रिक कारणे समोर केली जाते. ठेकेदार सरकारी अधिकाऱ्यांना जबाबादार धरतात. तर अधिकारी ठेकेदारांवर ठपका ठेवून मोकळे होतात. यात सर्वसामान्य नागरिक भरडले जातात. त्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. नंतर जुनीच कामे नव्याने टेंडर काढून केली जातात. यात लाखो रुपयांची वायफर उधळपट्‍टी होत असते. त्यामुळे आता अतिरिक्त सुरक्षा रक्कम घेऊन कामे अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Jal Jeevan Mission
शिंदेंचा मोठा निर्णय; 'त्या' ३८८ जुन्या इमारतींचा पुनर्विकास

जल जीवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत  १५ लाखांवरील कामे ऑनलाइन पद्धीतने ई- टेंडर कढून दिली जात आहे. नंतर कंत्राटदाराचे तांत्रिक बाबी व लेखा संबंधित बाबी काटेकोरपणे तपासण्यात येतात. त्यांनतर निविदा प्रक्रिया अंतिम करुन कार्यादेश आदेश देण्यात आले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जवळपास ३० वेगळया कंत्राटदारांना काम देण्यात आले. निविदा प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असून स्पर्धात्मक होत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत ८०० योजनांचे कार्यदेश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त योजनेचे कामे चालू असताना ते गुणवत्तानुसार होत आहे की नाही, याची तपासणी शासनाकडून नियुक्त यंत्रणे मार्फत तपासणी केले जात आहे. १५ लाखांपेक्षा कमी रकमेच्या ग्रामपंचायतला कार्यान्वित यंत्रणा म्हणून हस्तांतरण केले जात आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com